मुंबई रिपोर्टर.. - एसटीच्या कॉल सेंटरबाबत वाढत्या तक्रारी पाहून महामंडळाने १ जूनपासून कॉल सेंटरच्या मनुष्यबळात वाढ केली आहे, यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची ‘कॉल वेटिंग’ आणि ‘कॉल न घेणे’ अशा समस्यांतून सुटका होईल आणि प्रवाशांच्या सर्व प्रश्नांना त्वरित उत्तर मिळणे शक्य होईल, असा दावा महामंडळाने केला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी सेवांचे नियमन आणि वेळापत्रकाची एका फोनवर माहिती मिळावी, यासाठी १६ नोव्हेंबर २०१७ रोजी खासगी कंपनीच्या मदतीने कॉल सेंटर सुरू केले. एका सत्रात ‘तीन कर्मचारी’ यानुसार कॉल सेंटर सुरू झाले. मात्र, राज्यभरातून रोज दीड ते दोन हजार कॉल येत असल्यामुळे कॉल सेंटरचा बोजवारा उडाला. बहुतांशी प्रवाशांना कॉल वेटिंग, माहिती न मिळणे, कॉल न उचलणे, माहिती उपलब्ध नसणे, असा त्रास सहन करावा लागला होता.
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींनुसार महामंडळाने खासगी कंपनीला मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना केल्या. १ जूनपासून कॉल सेंटरवरील मनुष्यबळात दुपटीने वाढ करण्यात आली. यानुसार पूर्वी एका सत्रात तीन कर्मचारी कार्यरत होते. सद्यस्थितीत एका सत्रात सहा कर्मचारी कार्यरत असून, तीन सत्रात सुरु असणाऱ्या कॉल सेंटरमधील कर्मचाºयांची एकूण संख्या १८ झाली आहे.
सव्वादोन मिनिटांचा एक कॉल
१८००-२२-१२५० हा एसटीचा नि:शुल्क क्रमांक आहे. कॉल सेंटरमध्ये येणाºया फोनपैकी एसटी फेºयांच्या चौकशीकरिता फोन सर्वाधिक येत आहेत. प्रवाशांकडून येणाºया फोनचा सरासरी वेळ हा सव्वादोन मिनिटे नोंदवण्यात आला आहे.
-
रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
कॉल सेंटरमध्ये कॉल वेटिंगच्या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्या. प्रवाशांच्या सोईसाठी १ जूनपासून कॉल सेंटरमधील कर्मचाºयांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. यामुळे कॉल सेंटरमध्ये प्रवाशांना त्वरित माहिती उपलब्ध होणार असून, तक्रारींमधून प्रवाशांची सुटका होईल.