भुम वन विभागाकडुन फॉरेस्टच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष तर प्राण्यांसाठी केलेले पानवटे कोरडे ठाक..

.
रिपोर्टर... भुम हाददीतील फॉरेस्टमध्ये पशु पक्षासाठी बांधण्यात आलेले पाणवटे कायम कोरडे ठाक पडलले आसल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधामध्ये आसपासच्या गावामध्ये जावून मानसावर हाल्ले करत आहेत. त्याच बरोबर फॉरेस्टच्या संरक्षणासाठी सुध्दा वन विभागाकडुन कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या नसल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राच्या वन विभागाने हवामानातील उष्णता कमी व्हावी म्हणुन झाडे लावा झाडे वाचवा हा उपक्रम हाती घेतला आहे.त्याच बरोबर कोटी च्या आकडेवारीने दर वर्षी झाडे लावण्याचे कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतले जातात. या सर्व उपक्रमाचे काटेकोर पणे पालन करण्याचे काम संबंधीत विभागाचे आसते. मात्र तसे होत नसुन या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. उस्मानाबाद जिल्हयातील भुम वन विभागाकडे वरिष्ठ अधिकार्याचे लक्ष नसल्याने तालुका स्तरावरील अधिकारी आपल्या मनमानी पध्दतीने काम करत आहेत. त्यामुळे फॉरेस्ट चे संरक्षण हा मुददा उपस्थित हो आहे. उन्हाळयाच्या दिवसामध्ये फॅरेस्ट ला आगीपासुन धोका होवू नये म्हणून फॉरेस्टच्या कडेला काही आतंरावर जाळरेषा मारली जाते. जेनेकरून फॉरेस्टला धेका होवू नये परंतु आशाप्रकारची कुठलीही काळजी वन विभागाकडुन घेण्यात आलेली नाही. त्याच बरोबर फॉरेस्ट मधील हिंस्र् प्राणी बाहेर जावू नयेत म्हणून त्यांना पाणी पिण्यासाठी पानवटे बांधण्यात आलेले आहेत. परंतु कोरडे ठाक पडलेले पाणवटे पाहुन प्रांण्याची पाण्यासाठी भटकंती होत आसुन ते प्राणी मानसाच्या वस्तीमध्ये जावून मानसावर हाल्ले करत आहेत. या संगळया गोष्टीला वन विभातील अधिकारी जिम्मेदार आसुन यावर लवकरात लवकर उपाय योजना व्हावी आशी मागणी फॉरेस्ट च्या लगत आसलेल्या गावकर्याकडुन होत आहे.