रिपोर्टर.. नुकत्याच पार पडलेल्या उस्मानाबाद एसटी महामंडळाच्या निवडीमध्ये विभागीय जिल्हा कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर अनभुले यांची निवड करण्यात आली आसुन गेल्या दोन वर्षापासुन या पदावर बिनविरोध निवडुन येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या निवडी बददल भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये स्वताच्या पायावर उभे राहुन खाजगी शिकवणीच्या माध्यमातुन हाजारे विदार्थ्याचे भवितव्य घडवनार्या वैजीनाथ खोसे यांना शिक्षण क्षेत्रातील मानाचा आसणारा भिष्माचार्य पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
एसटी कामगारांच्या समस्या दुर करून येणार्या आडीआडचनी सोडवण्याचे काम सातत्याने मधुकर अनभुले यांनी केले आहे.आपल्या लिन स्वभावामुळे समाजात त्यांची निर्माण झालेली ओळक ही कौतुकास्पद आहे. त्या पध्दतीनेच कामाशी प्रमाणीक राहुन एसटी महामंडळातील आपल्या सहकारी कामगारांच्या प्रतेक समस्येकडे लक्ष देने ही त्यांची खाशीयत आहे. संघटनेचे काम निष्ठेने करूण आपल्या पदाची जिम्मेदारी योग्य रितीने पार पाडल्यामुळे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये क्रिडा क्षेत्रातील निवडी बददल बिभिषण पाटील, आनिल गुरव यांचा ही सत्कार करण्यात आला.या वेळी भुम,परंडा,वाशी मित्रमंडळातील सदस्य डॉ.तांबे,सुधीर मोटे,श्रीराम क्षीरसागर,दिलीप चौधरी,प्राध्यापक सुर्यकांत कापसे,प्राध्यापक विवेक कापसे,आण्णासाहेब जाधव,प्राध्यापक सोन्ने,अॅड.सोन्ने,बाळासाहेब डोके आदिंची उपस्थिती होती.