.
रिपोर्टर... रूग्णांना आॅडमीट करण्यासाठी कॉट शिल्लक नसल्याने तिन ते चार दिवसापासुन गरोदर रूग्ण खुल्या जागेत आणि फरशीवर झोपवण्याचा प्रताप उस्मानबादच्या स्त्री रूग्णालयामध्ये चालु आसल्याचे दिसत आहे.ही स्थिती बर्याच दिवसापासुन डोळयासमोर आसतानासुध्दा कोनत्याच आरोग्य विभागातील वरिष्ठाचे किंवा राजकीय प्रतीनिधी चे याकडे लक्ष नाही.
उस्मानाबाद शहरामध्ये 60 कॉट चे आसल्याले स्त्री रूग्णालय बर्याच दिवसापासुन समस्याच्या घेर्यामध्ये सापडलेले आहे. या ठीकाणी शासनाच्या माध्यमातुन रूग्णांना सर्व सुविधा मोफत आसल्यामुळे शहरासह आसपासच्या भागातील डिलीवरी चे रूग्ण मोठया संख्याने या ठीकाणी येतात.परंतु आलेल्या रूग्णांना परेशानीचा सामाना या ठिकाणी करावा लागत आसुन त्यांना खुल्या जागेत आणि फरशीवर झोपावे लागत आहे. या ठीकाणी रूग्णांसाठी लागणार्या औषध गोळयाचा पुरवठा होत वेळेत हो नसल्याने आॅडमीट आसलेल्या रूग्णांना लागणारी पुर्ण औषध गौळया भाहेरून आणाव्या लागतात. नेहमीच या समस्या आसताना सुध्दा याकडे सर्वाचे दर्लक्ष आसल्याचे दिसत आहे.