अधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.


___________

   रिपोर्टर...राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनीआज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2013मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.  1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं. सायबर सेलमध्येही काम केलं.महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.राज्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पद सांभाळलं.