लोकसेवा संस्थेचे बॅंकींग क्षेत्रात पदार्पण





रिपोर्टर...उस्माानाबाद जिल्हयातील बेरोजगारी हा मुददा समोर ठेवून स्थापण करण्यात आलेल्या लोकसेवा संस्थेने चित्रपट निर्मीती,समाजीक विषय आणि केद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या विषयावर काम करत आता बॅंकींग क्षेत्रात पदार्पण केले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्या साधुन एक मे रोजी लोकसेवा महिला सहकारी पतसंस्थेची सुरूवात करण्यात आली.या कार्यक्रमाला एसटी महामंडळ कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मधुकर अनभुले तसेच भुम, परंडा वाशी मित्रमंडळाचे सदस्य याच्यासह पतसंस्थेच्या चेअरमन सौ.राणी श्रीराम क्षीरसागर,सचिव सौ.वैशाली महेश टकले, सहसचिव सौ.सुषमा अरविंद पाटील ,संचालक सौ.आशा आनिल माने,  सौ.आशा बाबुराव कुलकर्णी,सुरेश पवार,आरविंद पाटील,महेश टकले,श्रीराम क्षीरसागर,धनंजय कुलकर्णी,आनिल माने यांच्यासह बॅंकेचे सभासद मोठया प्रमाणात उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हयामध्ये बेरोजगारीचा मुददा फार एैरणीवर आहे. या समस्येवर लक्ष केद्रीत करत लोकसेवा संस्थेने आगदी तिन वर्षातच सामाजीक विषय हाती घेवून काम करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरूवात लोकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन या चित्रपट निर्मीतीच्या कामापासुन करण्यात आली.चित्रपट निर्मीतीच्या कामामध्ये स्वच्छ भारत मिशन या केद्र सरकारच्या अभियानाला छोटीशी मदत म्हणुन गुड मॉर्नीग गोल्या नावाचा स्वच्छतेवर भाष्य करणारा लघुपट निर्मीत केला.त्याच बरोबर जिल्हयातील सामाजीक परिस्थिवर आधारीत आसनारा निर्धार नावाचा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटामध्ये जिल्हयातील बरेच असे कलाकार आहेत की त्याचा आणि चित्रपट क्षेत्राचा काहीही संबंध नव्हता परंतूू आज आशा लोकांना एक दिशा दाखवण्याचे काम आमच्या लोकसेवा संस्थेने केले आहे.आणि आगदी काही दिवसातच शैक्षणीक क्षेत्रात सुध्दा लोकसेवा संस्था आपल्याला दिसणार आहे.