औरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम




 रिपोर्टर.. औरंगाबाद शहरामध्ये दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आसुन आतापर्यंत 45 जण जखमी आणि दोघांचा मृत्यू झला आसल्याची माहीती मीळाली आहे. रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांना काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना  लावण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबाद श्हरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. शहरातील काही भागांमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. आता हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं अवहान पोलीस यंत्रनेकडुन करण्यात आले आहे.

मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलावरी, चाकू , लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यात पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी दिसेल ते वाहने, दुकाने पेटवून दिली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे.