चुकीच्या बदल्यांची चौकशी व्हावी.. 338 विस्थापित शिक्षकांचे ठिया आंदोलन



महाराष्ट्र लाईव्ह  रिपोर्ट..


 शिक्षण विभागाने चुकीच्या पध्दतीने शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे काही शिक्षक आडचनीत आले आहेत. सन 2018 च्या परिपत्रकानुसार प्रतेक टप्यात बदलीच्या यादया जाहीर करण गरजेच आसताना त्या न जाहीर करता कनिष्ठ शिक्षकांना सेवा जेष्ठ शिक्षकांच्या जागी नेमनुका देवून सेवाजेष्ठतेचा नियम डावलण्यात आला आहे. या कारणामुळे शिक्षकांनी ठिया आंदोलन करूण बदली प्रक्रीयेविरोधात न्यायालयात जाण्याची परवानगी जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाकडे मागीतली आहे.