महाराष्ट्र लाईव्ह रिपोर्ट
येडशी येथे गेल्या तिन महीण्याच्या कालावधीमध्ये जवळ जवळ 300 पेक्षा जास्त लोकांना माकडानी आपली शिकार बनवल आहे.त्यामुळे येडशी गावामध्ये लहान मुलाना आणि वृध्दाना फिरने देखील मुस्कील झाले आहे. माकडांची एवढी दहशत या गावामध्ये आसताना सुध्दा याकडे वन विभाग आणि प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील रामलींग तिर्थक्षेत्र महाराष्ट्रात नावलौकीक आहे.जास्त तर येथील माकडामुळे हे तिर्थक्षेत्र सर्वाच्या लक्षात रहाते. पुर्वीपासुनच रामलींग आणि येथील माकड यांचा मोठा इतिहास आहे.परंतु देवरूपी मानली जानारी माकड आज मानसाच्या आणि लहान मुलाच्या जिवावर उठल्याचे दिसत आहे.गेल्या काही दिवसामध्ये लहान मुलांना आणि मोठया मानसाला माकडानी आपली शिकार बनवण्यास सुरूवात केली आहे.त्यामुळे येडशी गावामध्ये माकडानी चांगलीच दहशत निर्माण केली आहे.बर्याच दिवसापासुन माकडाचा हा धुमाकुळ सुरू आसल्याने येडशी येथील ग्रामपंचायतने लोकवाटा जमा करून माकडांना पकडण्यासाठी यवतमाळ येथुन एका टिमला बोलावुन घेतले. परंतू माकड ती माकडच आसल्याने या टिमलाही पुर्ण माकड पकडता आली नाहीत. काही माकड पकडण्यात आली परंतू आनखी काही हिंसक माकड मोकाट गावामध्ये फिरत आसल्याने लहान मुलांना चावा घेत आहेत. येडशी येथिल प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये या प्रकारची पेशंट वाढल्यामुळे औषधाची कमतरता पडत आहे. रॉबीज नावाची जी लस आसते ही लस याठीकानी कमी प्रमाणात मिळत आसल्याने माकड चावलेले पेशंट सोलापुर आणि उस्मानाबाद या ठिकानी पाटवण्यात येत आहेत. याकडे देखली जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. महत्वाचे म्हणजे जवळच रामलींग आभयआरण्या आसल्याने त्या ठीकानी माकडांना पाणा पिण्याची सोय नसल्याने माकड मानसाच्या वस्तीमध्ये येत आसल्याची माहीती येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिली.
रिपोर्ट
श्रीराम क्षीरसागर
उस्मानाबाद
मो.9850277543