राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा प्रताप 30 लाख किमतीच्या नामदर्शक कमाणी विकल्या भंगारातरिपोर्ट महाराष्ट्र लाईव्ह
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने महामार्ग क्रमांक 211 वरील चार नामदर्शक कमाणी कुठलीही निवीदा न काढता भंगारात विकल्याची माहीती महाराष्ट्र लाईव्ह च्या हाती आली आहे.या कमाणी प्रतेकी आठ लाख किमतीच्या आसुन भंगारात कोन घातल्या आणि त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणे गरजेचे आहे.

सोलापुर — धुळे हा राष्ट्रीय महामार्ग 211 या क्रमांकाने ओळखला जात होता.परंतू ज्या वेळी हा रोड फोर लाईन बनवण्यासाठी प्रायव्हेट कंपणीला देण्यात आला त्यावेळी त्या रोडवरती आसलेल्या नामदर्शक कमाणी प्रायव्हेट कंपणी कडुन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला देण्यात आल्या होत्या त्या कमाणी या कार्यालयाने कुठलीही निवीदा न काढता भंगारात घालुन त्याची वाट लासवल्याची माहीती मीळत आहे.या बाबत चौकशी केली आसता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. या चार कामीणी कमीत कमी प्रतेकी सात ते आट टन वजनाच्या आसुन त्याची प्रतेकी सहा ते सात लाख एवडी किंमत आहे.  या  प्रतेक कमाणीला पाण्यापासुन संरक्षण म्हणून 200 कीलो आॅलोमीनियम वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याची भंगारात देखील भरपुर किमंत येवू शकते. हा सगळा प्रकार कोन केला त्याबाबत सार्वजनीक बांधकाम विभागामध्ये कसल्याही प्रकारची माहीती उपलब्ध नाही. आत्ता नेमकी या बाबत कारवाई कोणावर होणार हे पाहाणे गरजेचे आ​हे.