वऱ्हाडाच्या टेम्पाेला भीषण अपघात; 12 जण ठार







 रिपोर्टर..मुखेड :.

 खराेसा ता. निलंगा (जि. लातूर ) येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुखेड येथे येत असलेल्या आयशर टेम्पाेला जांब- शिरूर रस्त्यावर अपघात हाेऊन टेम्पाेमधील 12 जण ठार झाले, तर दाेन अत्यवस्थ असलेल्या नांदेड येथे हलविल्याचे उपजिल्हा रूग्णालयातील अधिकऱ्यांनी सांगितले.या अपघातामध्ये जवळपास 20 जण जखमी असून त्यांच्यावर मुखेड येथे उपचार चालु असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक संजय चाेबे यांच्यासह पाेलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे

शनिवारी (ता. 12) लग्नाची तारीख असल्याने शेवटच्या दिवशीच्या मुहूर्तासाठी लग्नांची संख्या माेठी हाेती. त्यातच खराेसा ता. औसा (जि.लातूर) येथील नारंगे परिवार व मुखेड येथील टिमकेकर परिवाराचे मुखेड येथे लग्न साेहळा आयाेजित केला हाेता. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास जांब-शिरूर रस्त्यावर आयशर टेम्पाे (एम.एच.36-एफ-3519) व टँकर (एम.एच.04-ईवाय-770) यांच्यात जाेराची धडक झाल्याने बारा जण जागीच ठार झाल्याची घटना असून दाेन जणांचा मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.