रिपोर्टर...राज्य कारभार कसा चालवायचा हे शिकविणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आम्ही वंशज असून आता आम्ही आमच्या आरक्षणासाठी आपणाकडे भीक मागणार नाही तर आम्ही आता आमचे आरक्षण हिसकावून घेवू असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी नळदुर्ग येथे धनगर समाज आरक्षण समीतीच्या वतीने आयोजित भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलनात बोलताना दिला.
धनगर आरक्षण समीतीच्या वतीने धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करावे, व सोलापूर विदयापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची आमलबजावणी करावे या मागणीसाठी भव्य मोर्चा व राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सक्षणा सलगर बोलत होत्या. यावेळी या आंदोलनात माजी जिल्हा परिष्द सदस्य गणेशराव सोनटक्के, सोमनाथ गुडडे, सुनिल बनसोडे, लोहारा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा लांडगे, प्रा. जयश्री घोडके, आदी उपस्थीत होते. विजया सोनकाटे, सौ. महानंदा पैलवान, सौ. माधुरी घोडके, शहाजी हाके, श्रीकांत कोकरे, सुरेश बिराजदार, आण्णा सोनटक्के, अरविंद घोडके, सौ. शारदा घोडके आदी उपस्थीत होते.
प्रारंभी येथील किल्ला गेट येथून मुख्य बाजारपेठेतून भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक मार्गे बसस्थानक परिसरात आल्यानंतर मोर्च्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको मध्ये करण्यात आले. यावेळी बहूसंख्य धनगर बांधव आपल्या डोक्यावर पिवळया टोप्या परिधान केल्या होत्या तर गळयात मोठया प्रमाणात पिवळे पंचे ही घालून सर्वत्र मोर्चामध्ये भंडारा ही लावण्यात आला. यावेळी पुढे बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, या सरकारने आम्हाला केवळ आश्वासन देवून धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलत ठेवले आहे, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ फसव्या घोषणा करुन धनगर समाजाची फसवणूक करीत आहे त्यामुळे आता आपल्या समाजाने एकजूट दाखवून ज्या प्रमाणे यांना सत्तेत आणले त्याप्रमाणे सत्तेवरुन खाली खेचण्याची तयारी ठेवावी असे ही त्या म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के म्हणाले की, आम्हाला या भाजप सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ठ करतो म्हणून सत्तेत आले पण त्याचा कांही उपयोग झाला नाही तर सोलापूर विदयापीठाला राजा माता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची घोषणा करुन ही आजून ही नाव का दिले जात नाही यामध्ये कांही तरी गौडबंगाल आहे म्हणून आता धनगर समाजाने जागे होवून आता आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी तयारीला लागायाचे आहे असे ही ते म्हणाले. यावेळी या आंदोलनात सात वर्षाच्या समरवीर चौरे या बालकांने भाषणास सुरुवात करुन सरकारवर तोफ डागली. तर या वेळी वैष्णवी कागे जळकोट, माधुरी घोडके, जयश्री घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सोमनाथ गुडडे आदीचे भाषणे झाली. या वेळी मोर्चात आणि रास्ता रोको आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते मंडळ अधिकारी श्री गांधले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि त्या नंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.