स्वाभीमानी शेतकरी संघनेचा तुळजापुरात रस्ता रोखोरिपोर्टर....शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व भाजीपाल्याला हामीभाव आणि विमा संरक्षण मिळावे यासाठी स्वाभीमानी शेतकारी संघटनेच्या कार्यकर्त्यानी तुळजापुर येथे रास्ता राखो आंदोलन केले.
संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले होते परंतू  दिलेल्या निवेदनावर कोणत्याही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल रोजी शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर आज टमाटे आणि भाजीपाला रोडवर टाकुन आंदोलन करण्यात आले.