दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके आठ दिवसात विदयार्थ्यासाठी उपलब्ध


   रिपोर्टर... शैक्षणीक नियमानुसार दहावी आणि पहील्याच्या वर्गाचा बदललेला आभ्यासक्रम पहाण्यासाठी  विदयार्थ्याची वाढलेली उत्सुकता  लवकरच समाप्त होणार आहे.कारण बदलेलया नविन आभ्यासक्रमाची पुस्तके येत्या आठ दिवसात विदयार्थ्याच्या हातात पोहचतील आशी माहीती बालभारतीच्या सुत्रांकडुन कळाली आहे.

काही शाळांचे दहावीचे नव्या वर्षाचे वर्ग या महिन्याच्या पहिल्या तर काही शाळांचे वर्ग दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. मात्र, पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील,आशी माहीती बालभारती कडुन सांगण्यात आली आहे. नववीची वार्षिक परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यास सुरू होतो. त्यामुळे विदयार्थ्यांना दहाविच्या आभ्यासक्रमाची उत्सुकता आसते.
यावर्षी दहावीसह पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदला आहे. यामध्ये पुर्वीची पध्दत बदलुन नविन पध्दत आखण्यात आली आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या धडयाखालीच लिखीत स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.त्यामुळे विदयार्थ्यांना कमी वेळेत जास्त सराव करता येईल आणि पाठांतर करत बसण्याची गरज भासणार नाही. इयत्ता आठवी आणि पहिलीची बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्याने बाजारात येतील, असे सांगण्यात आले आहे.
दहावीच्या पाठ्यपुस्तकाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दहावीच्या सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके "बालभारती'च्या राज्यातील दहा डेपोमध्ये  मंगळवार दि.3 एप्रील पासून वितरकांसाठी उपलब्ध होतील. वितरकांमार्फत पाठ्यपुस्तकांची खरेदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ही पुस्तके बाजारपेठेत येवून लवकरच विदयार्थ्याच्या हातात येतील.