रिपोर्टर...उन्नाव आणि कथुवा येथिल घटनेतील पिडकतेला न्याय मिळावा आणि वारंवार आशा प्रकारच्या होणार्या घटनेवर आवर घालावा या उददेशाने सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबादेत कॅण्डल मार्च काढण्यात आला या घडलेल्या घटनेचा तिव्र निषेध करण्यासाठी लहान लेकरासह महीला व नागरीक मोठया संख्याने हातात मेनबत्ती घेवुन रस्त्यावर उतरले होते.
जम्मू काश्मीर येथील कटुवा येथे 8 वर्षीय मुलीला एका मंदिरात बंदिस्त करून 6 दिवस सामूहिक बलात्कार करून ठार केले व उत्तर प्रदेश येथील उन्नाव येथील घरकाम करणाऱ्या मजुराच्या 16 वर्षीय मुलीवर आमदाराने वारंवार बलात्कार केला व न्याय मागणाऱ्या मुलीच्या वाडीलास धमकावले जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
या दोन्ही घटनेचा निषेध नोंदवत आरोपीस फाशी देण्याची मागणी करत कॅण्डल मार्च काढून झोपलेल्या शासनास जागे करण्यासाठी मोर्चा काढुन रात्री 7 वाजता जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले..