महागाई इतकी खायचं काय.. युती सरकार हाय हाय...रिपोर्टर..पेट्रोल, डीझलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासह इंधन दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, या मागणीसाठी उस्मानाबाद लोकसभा युवक काँग्रेस आणि उस्मानाबाद तालुका काँग्रेसच्यावतीने लातूर-बार्शी महामार्ग ढोकी  येथील मुख्य पेट्रोलपंप चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवित विद्यमान भाजपा सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविण्याचे काम गेली वर्षभर सुरू ठेवले आहे.  गत सहा महिन्यातील सर्वोच्च भाव पातळीवर पेट्रोल, डीझेलचे पोहोचले आहे., तर घरगुती गॅस सिलिंडर आजच्या सर्वाधिक किमतीवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासह इंधन दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी जाहीर केल्यानुसार  उस्मानाबाद लोकसभा काँग्रेसच्यावतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यासह इतर जीवनाश्यक वस्तुंच्या भाववाढीकडे लक्ष वेधण्यात आले, तर सरकार विरोधात नारेबाजीने परिसर दणाणून गेला होता.
 मंडळ अधिकारी आकोसकरसाहेब यांना निवेदन देऊन जाचक भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी उस्मानाबाद काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण दादा सरडे,पर्यावरण  विभागाच्या   प्रदेश उपाध्यक्ष शीला उंबरे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष नारायणआप्पा समुद्रे, उस्मानाबाद लोकसभा युवकचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, नितिनजी बागल,अग्निवेश शिंदे,रोहितजी थिटे, ढोकीचे सरपंच नानासाहेब चव्हाण,उपसरपंच अमोलपापा समुद्रे,सेवादलचे अयूब पठान,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सिराज मुल्ला,नासिर शेख,अमर समुद्रे, युवकचे विधानसभा उपाध्यक्ष परवेज काझी,जनरल सेक्रेटरी राहुल पोरे,अंकुश दाने,इरफ़ान कुरैशी,जुबेर पठाण,राजाभाऊ कदम,सुनिल लंगडे,प्रफुल्ल समुद्रे,रविशंकर ढवारे,रणजित समुद्रे,सूरज समुद्रे,नितिन माळी,शैलेश धाकपाडे काँग्रेस पदाधिकारी आणि ढोकी ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.