

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून येडेश्वरीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे. यात्रेतील आजच्या मुख्य दिवशी पालखी सकाळच्या सुमारास मंदिरातून वाजत-गाजत आमराईतील चुनखडीच्या शेतातुन यात्रास्थळी येते. याप्रसंगी श्री येडेश्वरी देवीची मंदिरात जावून एकही दिवस पूजा अर्चा करण्यासाठी न चुकणारे लहूअप्पा बांगर व देवीभक्त लालासाहेब बारकुल यांच्याहस्ते आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, जिल्ह्यावरचं संकट दूर होवून जिल्हा सुजलाम सुफलाम होवू दे, इडा पिडा टाळू दे ! बळी राज्याचं राज्य येऊ दे !! अशी येडेश्वरी चरणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रार्थना केली.महत्वाचे म्हणजे या वर्षीची यांत्रा भक्ताच्या नेहमीच लक्षात रहाण्यासारखी आहे.