रिपोर्टर...राज ठाकरें यांची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा आहे. मुंबईत ठिकठिकाणी याचे बॅनर्सही लागलेत. 2019ची निवडणूक आता जवळ आली आहे. शेतकऱ्यांचा महामोर्चा नुकताच मुंबईवर धडकला होता. तर संसदेत टीडीपी सोमवारी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलतात, राज्य आणि केंद्र सरकारबाबत काय भूमिका घेतात, याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईतील पेडर रोड येथे शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. राज ठाकरेंनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. पण या भेटीमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
मात्र या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखतही घेतली होती.