सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्नरिपोर्टर...  गटशिक्षण विभाग, पंचायत समिती भूम यांच्या वतीने आज दि.२७/०३/२०१८ रोजी भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, पंचायत समिती सभापती श्रीमती सोनालीताई चोरमले, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक सौ.वैशालीताई मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुका शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव व सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी शासकीय बालचित्रकला स्पर्धा -२०१७ तालुका स्तरावर गट १ ते ४ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
सर्व प्रथम २४ मार्च २०१८ रोजी जि.प.प्रा.शा.वडाचीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक धावरे रत्नपाल पोपट यांचे अपघाती निधन झाल्या कारणाने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

यावेळी उपसभापती सौ. वनिताताई मम्हाणे, अण्णासाहेब देशमुख, प्रवीण खताळ, ज्ञानेश्वर गित्ते, बापूसाहेब अंधारे, छायाताई कांबळे, काकासाहेब चव्हाण, सौ.मैनाबाई भडके, बाजीराव तांबे, चंद्र्कला हुके, हनुमंत पाटोळे, बालाजी गुंजाळ, संजय काका बोराडे, संजय पाटील अरसोलीकर, प्रवीण देशमुख तसेच
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे ग्रामस्थ व नातेवाईक, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.