रिपोर्टर..तुळजापुर तालुक्यातील सिंदफळ गावामध्ये साहावीत शिकणार्या एका विदयार्थ्यांने टाकावू वस्तु पासुन चक्क जेसीबी तयार करण्याची कमाल केली आहे.हा प्रयोग केल्यामळे त्याचे शाळेसह सगळीकडेच कौतुक केले जात आहे.
सिंदफळ गावातील सरस्वती प्रशालेतील विदयार्थ्यी शिवम जोतीबा पवार या साहावीत शिक्षण घेत आसणार्या विदयार्थ्यांने इंजिक्शेनचे मोकळे सिरीज,सलायनच्या नळया आणि पुटटा आशा प्रकारच्या टाकावू वस्तुपासुन जेसीबी बनवण्याचा पराक्रम केला आहे.एवढया लहाण वयामध्ये आशा पध्दतीचा बुध्दीवादी प्रयोग करून त्याने आपल्या प्रशालेतील विदयार्थ्यां पुढे एक प्रकारचा आदर्शच ठेवला आहे आसे म्हणावे लागेल.या आदी ही त्याने पाण्याचा पंप तयार केला आसल्याची माहीती त्याच्या वडीलासह वर्ग शिक्षक कसबे यांनी दिली.नविन प्रयोग करतेवेळी विज्ञानाचे पुजारी सर यांचे ही मार्गदर्शन मी घेत आसतो असे शिवमने सांगीतले. आशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करणार्या या छोटया तंत्रज्ञाला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे.