राष्ट्रीय जनसहयोग बालविकास संस्थेची कार्यशाळा संपन्न


उस्मानाबादच्या सेव्ह फार्मर विडोज या संस्थेचा सहभाग
उस्मानाबाद - राष्ट्रीय सहयोग व बालविकास संस्था या केंद्राच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पश्चिम विभाग केंद्राच्या आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय  कार्यशाळेत भाग घेण्यासाठी सेव्ह फार्मस विडोज या संस्थेची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा शिला उंबरे -पेंडारकर यांनी सहभाग  घेतला. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे पश्चिम विभागीय संचालक अनिल बाबू व सहसंचालक एस.पी.गंगूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेत महिलांचे आर्थिक सशक्तीकरण केंद्रसरकारच्या आय.सी.डी.एस. योजनेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महिलांसाठी समूह शिक्षण,स्वंयंसहायता समूहापुढची आवाहने व संकटे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या योजना, व्यवसाय प्रशिक्षण, शासकीय अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व  जबाबदारी, स्वयंसेवी संस्था उत्पादित मालाला बाजारपेठ आवश्यक असणारे स्थान निर्माण करणे, प्रत्येक उत्पादन क्षेत्रात भेटी देणे माहिती घेणे, जनशिक्षण संस्था योजनेच्या तांत्रिक व कौशल्य विकास संबंधी योजनेत संस्थांचा सहकार्य, संस्थासाठी प्रकल्प अहवाल व कार्यचौकट इत्यादी विषयांचा समावेश नागरी संस्था इंदौर कु. हेमलकाया संस्थापक संचालीका कनसेप्ट इंदौर केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहसंचालक एल.एस.मित्ता सूक्ष्म व मध्यम मंत्रालयाचे संचालक, मानव संसाधन विकास विभागाच्या जनशिक्षण संस्थान योजनेच्या समितीचे सदस्य डॉ.भूपींदरसिंग बहेल यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थासाठी केंद्र सरकारच्या योजना व त्यांची माहिती देण्यात आली.
          या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेव्ह फार्मस विडोजच्या अध्यक्षा शिला उंबरे- पेंडारकर यांनी मानले.