महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने आ.चौगुले यांचा सत्कार

 
रिपोर्टर...अंगणवाडी सेविकांवर लावलेला अन्यायकारक 'मेस्मा' कायदा रद्द करण्यासाठी शासनास भाग पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार मा.ज्ञानराजजी चौगुले यांचा येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.  यावेळी महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री.भगवान देशमुख, सचिव प्रभावती गायकवाड, उमरगा तालुकाध्यक्ष सौ.सुरेख ठाकूर, लोहारा तालुकाध्यक्ष सुनीता कदम, बिटप्रमुख सविता गायकवाड, शिक्षण सूर्यवंशी, मुजावर बाई, प्रमिला सगर, साठे बाई, माकणी, शेख शहराबानू, विजय बारगळ, शामल मुसांडे, अनिता कांबळे, इंदुबाई पाटील, छाया पाटील, फरजाणा शेख, सुनीता कुलकर्णी, यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.