सरकारी बॅंकेंच्या बदमाश पणामुळे मराठवाडयातील छोटे उदयोग बंद


राजकीय लोकांना बॅंकेची साथ मराठवाडयातील युवकांवर मात्र आत्महात्याची वेळ!

श्रीराम क्षीरसागर
संपादक महाराष्ट्र लाईव्ह

उस्मानाबाद... मागील दोन चार दिवसामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कर्ज प्रकरणाची सगळीकडे चर्चा चालु आसल्याने सगळयांनाच सरकारी बॅंका किती बदमाश पणाने वागतात.याची माहीती झाली असेल. मोठया लोकांना किती कर्ज दिल जात आणि कशा प्रकारे परतफेड केली जाते.याची माहीती या झालेल्या चर्चेच्या माध्यमातुन सगळयांना आसेलच.यामुळेच मराठवाडयातील आनेक नवयुवक चांगल्या प्रतीची बुध्दी असुनही उदयोग करू शकत नाहीत.आणि थेाडया थोडया रक्कमेसाठी शेतकरी आत्महात्या करतात.

प्रत्यक्ष आनुभव
पत्रकारीता क्षेत्रामध्ये ताट मान करूण जगण्यासाठी आणि कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही नेत्याची दलाली न करण्यासाठी मी 2015 साली एक व्यावसाय करण्याचे ठरवले. पत्रकारीता करत करत तो व्यावसाय करावा असे नियोजन केले.जवळ असलेलं काही सोन मोडुन काही पैसे गोळा करून 13 लाख पंन्नास हजार रूपयांची सिमेंट विटा बनवण्याची मशनरी खरेदी केली. उस्मानाबाद च्या एमआयडीसी मध्ये भडयाच्या जागेमध्ये महीना पाच हाजार भाडे या तत्वावर तो कारखाना चालु केला. हा कारखाना सहा महीने चालवला परंतु त्यावेळी दुष्काळी वातावरण निर्माण झाल्याने उन्हाळयाच्या दिवसामध्ये व्यवसाय मंदी आली आणि त्यावेळेस मला तो कारखाना चालवताना आर्थिक आडचन निर्माण झाली. कच्च्या मालाला पैसे नाहीत म्हणुन  मी उस्मानाबादच्या युनियन बॅंकेत कर्ज मागण्यासाठी गेलो. त्या बॅंकेंमध्ये माझ पुर्विपासुनचे खाते चालु होते.माज्या खात्यावर कमीत कमी 30 लाखाचे व्यवहार झालेले होते. युनियन बुॅंकेचा मॅंनेजर माझा कारखाना बघण्यासाठी दोन ते तिन वेळा आला आणि कर्ज देतो म्हणून मला कागदपत्राची जमवाजमव करण्यासाठी सांगीतले. मी काही दिवसात संपुर्ण कागदपत्र तयार करूण आगदी ईन्कमटॉक्स सहीत संपुर्ण कागदपत्र तयार करून फाईल बॅंकेत दाखल केली.व दहा लाखाच्या आत कर्ज मागणी केली. फाईल दाखल केल्यावर मॅंनेंजरने जामीन लागेल आसा मुददा उपस्थित केला. मी माज्या शेताची जामीन देण्याच ठरवल परत मॅंनेजर म्हणाला तुम्हच्या शेताच मुल्य किती आहे हे बघावे लागेल मी म्हणालो ठिक आहे. या मध्ये तिन महीण्याचा कालावधी गेला. परत शेताचं मुल्य पहाण्यासाठी सोलापुरहुन बॅंकेची मानसं बोलवण्यात आली.पहाणी करून बॅंकेच्या आटीमध्ये तुम्हची फाईल बसत आहे आणि लवकरच तुम्हची फाईल होवुन जाईल असे सांगण्यात आले.तो पर्यंत कच्यामालाला पैसे नसल्याने कारखना बंद ठेवावा लागला. महीना पाच हाजार जागेचे भाडे चालु आसल्याने त्याची रक्कम वाढत गेली. या काळामध्ये बॅंकेत माज्या जवळ जवळ 300 चक्कर मारून झाल्या.परत त्या मगरूर मॅनेंजरने  मला मार्च एंड चे कारण सागण्यास सुरवात केली.परत माज्या लक्षात आले की आपली फाईल टाळली जात आहे.मग मी आनखी तीन चार महीण्याचा कालावधी जावू दिला. आणि  भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना फोन करून मॅंनेजरला बोला म्हणून सांगीतले. कुलकर्णी हो म्हणले पण राजकीय नियमानुसारच! परत मी जिल्हाधीकारी नारनवरे यांना लेखी पत्राव्दारे कळवले. पण कोनाकडुनच काही हालचाली होत नसल्याने मी मुख्यमंत्रयांला व पंतप्रधानाला पत्र पाठवले.परंतु काहीच प्रतीसाद न मीळाल्याने गेल्या एक महीण्याखली 13 लाखाचा कारखना 5 लाख पंन्नास हाजाराला विक्री केला. त्यामध्ये भाडयाची रक्कम दिड लाख रूपये दयावी लागली. आशा प्रकारे युनियन बॅुकेच्या मुजोर मॅंनेंजरमुळे माझे नुकसान झाले. या मध्ये माझे एकटयाचेच नाही तर या कारखाण्यावर दहा कामगारांचे संसार चालत होते. आज ही माझी फाईल बॅंकेतच पडुन आहे. 
संभाजी पाटील यांच्या सरख्या लोकांना एकाच कारखाण्यावर दोन वेळेस लोन मीळत आसेल तर मराठवाडयातील तरूनांना सगळे कागदपत्र पुर्ण आसताना एकदाही लोन मीळत नसेल तर नवयुवक उदयोगाकडे कशाला येथिल! 2001 च्या रिजर्व बॅंकेच्या परिपत्रकानुसार ओटीएस च्या माध्यमातुन संभाजी पाटील यांचे कर्ज फक्त 25 कोटी मध्ये जर शटेलमेंट होत आसेल तर  दहा हाजार आणि 25 हजारांसाठी आत्महात्या करणसर्या शेतकर्याना का! काही शेटलमेंट मिळत नसेल याचा कुठेतरी विचार होणे गरजेच आहे. मंत्री लोकांच्या आठ दिचसाच्या खर्चामध्ये मराठवाडयातील तरूनांचं आक्क् आयुष्य उभ रहील तरी पण शेतकरी आणि सुशिक्षीत बेकार यांनाच या सरकारने बाजुला ठेवले आहे.  
राजकीय वसील्यावर काहीजन व्यावसाय उभाकरण्यासाठी आधिच बॅंकांकडून पैसे घेतात मग सबसिडी घेवुन तो व्यावसाय बंद करतात आसे लोक बॅंकवाल्यांना परवडतात परंतु एखदयाने इमानदारीने व्यावसाय उभा करून कर्जाची मागणी केली तर या बॅंकींग क्षेत्रातील मुजोर लोकं त्यांना का सहकार्य करत नाहीत हा प्रश्नच आहे.