आदर्श शिक्षण प्रसारक मंडळचा नौकरी मोहत्सव कौतुकास्पद सुशिक्षीत बेरोजगारांची मोठया प्रमाणात उपस्थिती ...


 .
. रिपोर्टर..  उस्मानाबाद  जिल्हा सध्या आपल्या मागासलेपणाची ओळख पुसून टाकतो आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके व शहरे राष्ट्रीय महामार्गाशी जोडली गेली आहेत. उद्योगासाठी जिल्ह्यातील पायाभुत सुविधांचा विकास होतो आहे. जिल्हा औद्योगिकदृष्ट्‌या डी प्लस झोनमध्ये असल्यामुळे येथे उद्योगनिर्मितीला अनेक सोयी सवलती व अनुकूल वातावरण आहे. जिल्ह्यात अ.भा.मराठी नाट्य संमेलनानंतर जिल्ह्यातील महिला व मुलांसाठी नुकतेच महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबीरामध्ये १ लाख २२ हजार रुग्णांची तपासणी करून २३४०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. असे मोठमोठ्या उपक्रमानंतर आज आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने प्र.का. सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांच्या पुढाकारातून या नौकरी महोत्सवाचे आयेाजन केले आहे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांनी येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर आयोजीत भव्य नौकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. 
 यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोद बाकलीकर, संस्थेचे संस्थापक गुरूवर्य के.टी. पाटील, भाजपा प्र.का. सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (आण्णा) पाटील,  भाजपा प्र.का. सदस्य नितीन काळे, ऍड. अनिल काळे, राजाभाऊ बागल, बार्शीचे उपनगराध्यक्ष कृष्णा बारबोले, प्रभाकर मुळे, प्रविण पाठक, गुलचंद व्यवहारे, नगरसेवक शिवाजी गवळी, विक्रांत संघशेट्टी, सत्यवान सुरवसे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक करताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्र. का. सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्या मनोगतातून घेतला व नौकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत त्याचा लाभ युवकांनी घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.  
यावेळी रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोद बाकलीकर यांनी श्रीरामनवमीच्या शुभमुहुर्तावर आयोजीत या नौकरी महोत्सवाच्या  उपक्रमाचे कौतुक करून संयोजक सुधीर (आण्णा) पाटील यांनी जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. सुजितसिंह ठाकुर यांनी सांगितले की, धाराशिव जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्‌या डी प्लस झोनमध्ये आहे. त्यामुळे उद्योगासाठी अनेक सोयी सवलती उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकांनी जिल्ह्यात उद्योग निर्माण करावे, या जिल्ह्यातील तरुण हे शेतकर्‍यांची होतकरू व प्रामाणिक मुले आहेत. येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे याचा लाभ उद्योग व्यवसायांना होऊ शकतो. जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आता रडत बसायचे नाही तर लढायचे आहे असे सांगून युवकांमध्ये ही ओळख बदलण्याची ताकद आहे. सध्या जिल्हा मागासलेपणाची कात टाकतो आहे. या जिल्ह्यात जे अशक्य आहे ते आता हा जिल्हा करू पाहतो आहे. जिल्ह्यातील तरूण, होतकरू व प्रामाणिक तसेच गरजवंत आहेत. या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास उद्योगांची प्रगती होईल असा विश्‍वास आ. सुजितसिंह ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आ. ठाकुर यांनी या नौकरी महोत्सवासाठी आलेल्या १०० हून अधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. व जिल्ह्यातील तरुणांना नौकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.पी. पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री. पडवळ यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शिवानंद पाटील, उपप्रशासकीय अधिकारी आदीत्य पाटील, अभिराम पाटील व संस्थेचे प्राचार्य व  सर्व विभागप्रमुख ,कर्मचारीवृंद, हजारो युवक, युवती उपस्थित होते.