सुधीर पाटील यांचा बेरोजगारी हाटाव उपक्रम रविवारी होणार्या नोकरी मोहत्सवाचा लाभ घ्यावा असे अवहान
   रिपोर्टर..           धाराशिव जिल्ह्यातील अल्पशिक्षीत ते उच्चशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भाजपा धाराशिवच्यावतीने रविवार दि. २५ मार्च रोजी भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये शंभराहून अधिक नामांकीत नॅशनल व मल्टीनॅशनल खाजगी कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो तरुणांना एकाच दिवशी नौकर्‍या मिळणार आहेत अशी माहिती आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर (आण्णा) पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी पुढे बोलताना सुधीर पाटील यांनी संागितले की, धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यातील मागासलेला व सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा आहे. जिल्ह्यात एक ही मोठा उद्योग व्यवसाय नसल्याने व जिल्ह्यातील सहकार क्षेत्र तत्कालीन नेत्याच्या नाकर्तेपणामुळे बुडीत निघाले आहे. बेरोजगार युवकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पशिक्षीत ते उच्चशिक्षीत युवक युवतींना नौकरीची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी यासाठी मागील सहा महिन्यापासून या नौकरी महोत्सवाची तयारी सुरू आहे. येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर रविवार दि. २५ मार्च रोजी होणार्‍या या भव्य नौकरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांची असणार आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोद बाकलीकर व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या नौकरी महोत्सवास अंदाजे २५ हजार बेरोजगार युवक, युती सहभागी होतील असे सांगून श्री. पाटील यांनी सांगितले की, हा नौकरी महोत्सव मोफत स्वरुपाचा असून कोणतेही शुल्क स्विकारले जाणार नाही. या महोत्सवात सहभागी सर्व कंपन्यांचे अधिकारी व बेरोजगार युवक युवतींच्या भोजनाची, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकीत कंपन्यांचे अधिकारी या युवक युवतींच्या मुलाखती १०० हॉलच्या माध्यमातून घेणार आहेत. या महोत्सवात एल ऍण्ड टी, महिंद्रा इलेक्ट्रिकल, टाटा डोकोमो, भारत फोर्स, एल.जी. इलेक्टॉनिक्स, व्हर्लफुल हायर, ऍक्सीस सेक्युरेटीज, डिश टी.व्ही., जिंदल रेक्टीफार्यस, टाटा ऍटो कॅम्प हॅन्डलींग सस्पेन्शन प्रा.लि. बजाज फिनसर्व्ह, सिपला, वोकार्ड, महिंद्रा सीआयई लि.पुणे, सोडेस्सो व इतर अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्या सहभागी होणार आहेत. या नौकरी महोत्सवात सहभागी होणार्‍या युवक - युवतींसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणी कक्ष सुरू केले आहेत तसेच घडीपत्रके, पोस्टर्स, डिजीटल होर्डींग आदींच्या माध्यमातून गावोगाव जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गावात दवंडी देऊन जनजागृती सुरू आहे. हा नौकरी महोत्सव मोफत स्वरुपाचा असून महोत्सवात सहभागी युवक युवतींना महोत्सवाच्या दिवशीच नौकरीचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. या नौकरी महोत्सवात मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील कंपन्यासह लातूर, सोलापूर येथील खासगी कंपन्या व नागरी सहकारी बँकांचा समुह सहभागी होणार आहे. महोत्सवात सहभागी युवक, युवतीच्या पात्रतेनुसार त्यांची निवड विविध कंपन्यांच्या माध्यमातून नौकरीसाठी केली जाणार आहे. या महोत्सवात नौकरी ही पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. यासंदर्भात कोणीही कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये कारण हा नौकरी महोत्सव संपुर्णपणे मोफत स्वरुपाचा आहे. जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींना नौकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात हाच या नौकरी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी या नौकरी महोत्सवात सहभागी व्हावे असे आवहान सुधीर पाटील यांनी केले आहे.