मुंबई -रिपोर्टर... शिक्षकांच्या
वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने
कायम ठेवला आहे, त्यामुळे उरलेली कार्यवाही पूर्ण करुन शिक्षकांचे वेतन तीन
दिवसांत मिळेल, शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय
दिल्यानंतर या प्रकरणी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला.
त्यांनतर, अनेक शिक्षकांच्या खाते बदलाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या
प्रक्रियेला स्वाभाविकपणे काही कालावधी लागणार होता. या प्रक्रियेमुळे
पाडव्याच्या दिवशी शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाहीत याबद्दल आपण दिलगिरी
व्यक्त करतो. परंतू शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील प्रक्रिया सुरु असून
येत्या तीन दिवसांत शिक्षकांचे वेतन होईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांनी स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व प्रक्रियापूर्ण
व्हायला २०-२५ दिवस लागतात त्यामुळे जुन्याच मुंबई बँकमधून वेतन या
महिन्यापुरता काढावा असे विभागाचे म्हणणे होते. परंतु शिक्षक आमदार कपिल
पाटील यांच्या हट्टापायी शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाही काही जणांचा हट्ट
युनियन बँकेचा होता त्यामुळे हा उशिर झाला ही वस्तूस्थिती आहे असे तावडे यांनी सांगितले.