सावरगाव जिल्हापरिषद शाळेत स्कुल डे च्या निमीत्ताने विविध कार्यक्रम ..


    रिपोर्टर  ---  जि.प.प्रा.शाळा सावरगाव येथील इ.4थी च्या विद्यार्थ्यांनी आज इ,1ली ते 3 री च्या
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करत ज्ञानदानाचे धडे गिरवले.निमित्त होते-इ.4थी वर्गाचा स्वयंशासन दिन!
आयुष्याची पायाभरणी करणारी शालेय जीवनातील ही 4 वर्षे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या व कोमल मनावर चिरकाल ठसा उमटविणारी असतात.आई ही बालकाची पहिली गुरु तर शिक्षक बालकाची दुसरी आई असावी, असे पुज्य विनोबा भावे यांनी म्हटलेलेच आहे.शाळेमध्ये  पहिलीत प्रवेश घेतेवेळी अपरिचित वातावरणात नवखे मूल भांबावून जाते,परंतु थोड्याच दिवसात ते शाळेशी एकरुप होते, कारण आईच्या ममत्वेने काळजी घेणारा गुरुजन वर्ग त्यास मिळालेला असतो.व हेच मूल जेव्हा त्या शाळेतील शेवटच्या वर्गात शिकून पुढील शिक्षणासाठी दुसरीकडे जाणार असते,तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा कल्लोळ हा फक्त त्या शाळेतील शिक्षकालाच माहित असतो याचा प्रत्यय आज जि,प.प्रा.शाळा सावरगाव येथील शिक्षकांना स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने आला.यावेळी 4थी च्या मुलांनी प्रत्यक्ष अध्यापन, शिस्तीचे धडे,शालेय कामकाज याचा अनुभव घेत आजचा दिवस संस्मरणीय केला.यावेळी समर्थ गाबणे हा मु.अ. तर करण वाकळे हा उपमुख्याध्यापक बनला.इतर मुलांनी सहशिक्षकाची भूमिका बजावत विद्यार्थ्यांना आध्यापन केले.
दुपारच्या सत्रात इ.3री च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत 4थीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत निरोप दिला.यावेळी 4थी.च्या आदित्य माळी व विश्वराज गवळी यांची मनोगते,मु.अ.शिवाजी वेदपाठक व शांताराम कुंभार यांनी मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 3 री.तील गणेश तोडकरी व आभार प्रदर्शन अमर बंडगर याने केले.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.इ.4थी च्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेसाठी 6 कुंड्या भेट म्हणून दिल्या.आजच्या या कार्यक्रमासाठी श्री .कटकदौंड व श्रीमती भोसले अनुराधा व कोरबू मँडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.