आपल घर मधील गायप झालेल्या मुलाचा मृतदेह बाभळगाव धरणामध्ये सापडला
 रिपोर्टर... तुळजापुर तालुक्यातील नळदुर्गजवळ असलेल्या अलियाबाद येथील आपलं घर बालक आश्रमातील दिपक दत्तात्रेय चव्हाण हा इयत्ता दहावीत शिकत असलेला मुलगा बाभळगाव येथील धरणाच्या पाण्यात मृतावस्थेत सापडला आसल्याने या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 
या घटनेची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात मयत मुलाच्या आईने दि. 25 रोजी सायंकाळी दिली असून आज्ञात व्यक्तीने आज्ञात कारणास्तव मुलाला पळविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आपल घर बालग्राम मध्ये दिपक दत्तात्रेय चव्हाण हा मुलगा राहत होता, तो दहावी मध्ये धरीत्री माध्यमिक विदयालयात शिकण घेत होता. मात्र दि. 22 मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर देवून तो आपल घर मधून गायब झाला होता. दिपक चव्हाण च्या आईने येथील पोलिस ठाण्यात दि. 25 रोजी आपला मुलगा गायब झाला असून आज्ञात व्यक्ती विरुध्द  फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र दि. 26 मार्च रोजी सकाळी बाभळगाव ता. तुळजापूर येथिल धरणाच्या पाण्यात दिपक चव्हाण चा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. त्यामुळे दिपक चव्हाण याचा घात पात झाला की तो आत्महत्या याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान येथील आपल घर बालग्राम मध्ये या संदर्भात विचारणा करण्याकरीता गेले असता आपल घर बालग्रामच्या व्यवस्थापक विजया बिवलकर यांनी सांगितले की,  तो दहावीची परिक्षा देत असताना दि. 19 मार्च रोजीच्या रात्री त्याचे आपल घर बालग्राम मध्ये एका मुला सोबत भांडण झाले, किरकोळ तक्रार झाली असली तरी दक्षता घ्यावी म्हणून आम्ही त्यास त्याच दिवशी रात्री दहा वाजता त्याच्या बाभळगाव ता. तुळजापूर येथिल घरी त्याच्या आईकडे सोडून त्याच्या आईकडून आपला मुलगा माझ्याकडे मिळाला म्हणून लिहून घेतले आणि आम्ही परत आपल घर बालग्रामला आलो. दरम्यान तो दि. 21 मार्च रोजी दहावीचा पेपर बाभळगाव येथून येवून दिला आणि दि. 22 मार्च रोजीचा शेवटचा पेपर देण्यासाठी ही तो बाभळगाव येथून येवून दिला आणि तो पुन्हा दूपारी आपल घर मध्ये आला आणि त्या दिवशी तो आमची सायकल घेवून गेला तो गायब झाला असे ही बिवलकर यांनी सांगितले आहे.
 घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी हे बाभळगाव ला रवाना झाले असून अधिक तपास करीत आहेत.