जिल्हयातील आपुरी राहीलेली म्हत्वाची कामे लवकरच पुर्ण करणार ...पालकमंत्री खोतकरउस्मानाबाद .. उस्मानाबाद जिल्हयातील अपुर्ण राहीलेली महत्वाची कामे लवकरच पुर्ण करून घेतली जातील.त्याच बरोबर जिल्हयातील आपत्तीजनक शेतकर्यांना सरसकट मदत देणार आसल्याची माहीती उस्मानाबाद चे पालक मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  दिली.या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्हयामध्ये काही दिवसापुर्वी झालेल्या गारपिटी मध्ये शेतकर्याचे नुकसान झाल्यामूळे स्वता पालकमंत्री यांनी पहाणी दौरा करून निकशा प्रमाने शेतकर्याना मदत देण्याचे अश्वासन दिले आहे. त्याच बरोबर उस्मानाबाद मधील रूग्नालयाचा प्रश्न आणि सिंचनाचा लवकरच मार्गी लावण्यात येईल.आशी माहीती पालकमंत्री यांनी या वेळी दिली.