-अनूसूचित जाती समितीची बोरगाव मंजू ला भेट

अकोला प्रतिनिधी  संदीप सोनोने :-दलित वस्ती मधे झालेल्या नाल्या व रस्ते बांधकामाची पाहणी केली शौचालय बांधकामाची अंमलबजावणी होत आहे की नाही यांची पाहणी केली बोरगाव मंजू ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न नागरिकांनी समिती समोर उपस्तीत केला बोरगाव आठवडी बाजाराचा प्रश्न सुध्दा नागरिकांनी उपस्तीत करुन बाजारात दुकानदाराना आपली दुकाने मांडण्याकरिता ओटे असून सुध्दा रस्त्यावर बाजार भरतो त्यामुळे शाळेत जाण्यात लहान मुलाना याचा त्रास सहन करावा लागतो याबाबत ग्राम पंचायत प्रशासन मात्र सुस्त आहे
अनूसूचित जाती समिती ची बोरगाव ला भेट असल्याचे ग्राम पंचायत सदश्यांन्ना माहिती देण्यात आली नाही बोरगाव मंजू ग्राम पंचायत ला नगर पंचायत बनवण्यास हालचाली सुरू असल्याचे समिती अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले गांवांतील विकास कामा बाबत ग्रामविकास अधिकारी सदश्यांन्ना विश्वासात घेत नाहीत असे ग्राम पंचायत सदश्य कैलास बागडे यांनी समिती समोर सांगितले ग्रामीण रुग्णालय चा प्रश्न हा गेल्या दोन वर्षा पासून रेंगाळत पडला आहे ग्राम पंचायत प्रशासना ने जागा उपलब्ध करून दिली नसल्याचे नागरिकांनी समिती समोर सांगितले