शहर स्वच्छ करण्याचा नगरपालिकेेचा संकल्प..

.


    रिपोर्टर..       उस्मानाबाद नगरपालिकेने 2018 या वर्षी स्वच्छ भारत मिशन या केद्र सरकारच्या  अभियानामध्ये सक्रिय भाग घेतला आसुन शहरातील प्रतेक प्रभागामध्ये नगर सेवकांने पुढाकार घेवून शहर स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे.उस्मानाबाद न.प.ने 2018 या वर्षामध्ये स्वच्छता अभियान स्पर्धेचे आयेजन करून प्रथम क्रमांकाला पारितोशीक देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शहरातील प्रतेक प्रभागामध्ये स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आसल्याचे दिसत आहे.

 स्वच्छता अभियान स्पर्धेत प्रभाग 9 मधील नागरिकांनी सहभागी होवून स्पर्धा जिंकण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा असे अवाहन गटनेते युवराज नळे यांनी केले. समता नगर येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली. याला नागरिकांतून ही सकारात्मक प्रतीसाद मिळाला. जेष्ठ नागरीक तथा साहित्यिक कमलताई नलावडे यांचे हस्ते स्वच्छता अभियान स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संदिप साळुंके, वैभव मोरे, मुहीज शेख, अकबर तांबोळी, बाळ पाटिल, बालाजी मगर, परमेश्वर इंगळे,यांचेसह प्रभागातील नागरिक उपस्थीत होते.