
कोरेगाव भीमा हिंसाचारावरून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. मुख्यमंत्री म्हणतात की, बाहेरच्यांनी हे कृत्य केलंय, तिथले ग्रामस्थही तेच म्हणताहेत, त्यामुळे हे दंगली घडवणारे बाहेरचे नेमके कोण लोक आहेत, हे सरकारने शोधून काढावं, असंही पवारांनी म्हटलं आहे
कृषी कर्जमाफीच्या मुद्यावरून पवारांनी संभाजी भिडे यांचं नाव न घेता टोला हाणलाय, काही लोक म्हणतात की 40 टन ऊस घेणाऱ्यांना कशाला पाहिजे कर्जमाफी, यावरूनच त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे हे स्पष्ट होतं. संभाजी भिडे यांनी कर्जमाफीवर टीका केली होती त्यालाही पवारांनी भाषणातून उत्तर दिलं आहे . कोरेगाव भीमाच्या दंगलीत काही हिंदुत्ववादी संघटनांनी चिथावणी दिल्याचं पवारांनीच सर्वप्रथम म्हटलं होतं. त्यावरूनच पवार आणि भिडे पुन्हा समोरासमोर आलेत.