उस्मानाबाद भाई
उध्दवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भाई उध्दवराव पाटील फाऊंडेशन च्या
वतीने व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने आज २६ जानेवारी २०१८
रोजी सुकाळी ठिक १० ते १ या वेळेत छत्रपती श्विाजी हायस्कुल उस्मानाबाद
येथे आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजीत
करण्यात आलेल्या शिबीरामध्ये कान,नाक, घसा, नेत्र तपासणी, रक्तातील साखर
तपासणी, रकतदाब तपासणी इ. आरोग्य तपासणी होऊन शिबीरात मोफत औषधोपचार केले
जाणार आहेत.जास्तीत जास्त गुरजवंतानी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन
फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.