नाविन्यपुर्ण उपक्रमाने नविन वर्षाचे स्वागत

मा.आ.दिलीपरावजी सोपल प्राथ. आश्रमशाळा आगळगाव याठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून केले.प्रशालेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली.मुलांनी विविध वेशभूषा केल्या जसे की मुलींनी भारतमाता,नवरीमुलगी,झाशीची राणी,नायिका, परी,यासारखे तर मुलांनी सैनिक,आदिवासी लोग, जोकर,वासुदेव,बुजगावणे,क्रिकेटपटू, क्रिकेतचाहता,डॉक्टर,शिक्षक,शेतकरी ,वारकरीअशी विविध रूपे घेतली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद डमरे सर यांनी केले .व आभार प्रदर्शन श्री सचिन ननवरे सर यांनी केले.तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.या वेळी शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक श्री संजीव सातपुते सर ,सर्वशिक्षक व  कर्मचारी हजर होते.