
आम्ही अनेकवर्षांपासून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहोत. आमच्यात आपसात कुठलाही वाद नाही. बाहेरच्यांनी इथे येऊन हिंसाचार केला. उलट भीमा - कोरेगाववर अन्याय होत आहे . मागच्या तीन दिवसांपासून लाईट-पाणी नाही अशी इथे अवस्था आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. भीमा-कोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड, जाळपोळ झाली. लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
दरवर्षी इथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. आम्ही त्यांच्या खाण्या-पिण्याची सोयही करतो. पण शासनाने आवश्यक बंदोबस्त न ठेवल्याने हिंसाचार घडला असे गावकऱ्यांनी सांगितले.
ज्यांचं नुकसान झालय त्यांना सरकारने मदत करावी. सगळ्यात जास्त अन्याय भीमा कोरेगाववर झालाय आणि आमचंच नाव बदनाम होत आहे . शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. सगळे समाज एकत्र राहात आहे .दलित समाजाची २०० वर्ष सेवा करतोय ,आमचा दंगलीशी काही संबंध नाही, असं ग्रामस्थांनी सांगितलं.