ज्ञानवर्धिनी विदयालयामध्ये राजमाता जिजाउंची जयंती साजरी

रिपोर्टर. केशेगाव येथिल ज्ञानवर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयामध्ये राजमाता जिजाउ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आगदी उत्साहाने साजरी करण्यात आली. त्याच बरोबर विदयार्थ्यांना फळांचे वाटप ही करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  विदयालयाचे मुख्याध्यापक बनसोडे एम.जी.हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन पे.शि.म. केशेगाव संस्थेचे अध्यक्ष विनोद कुमार पाटील हे उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन न्युज नेशन टिव्ही चॉनलचे जिल्हा प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर व मोरे एम.एस.हे होते तसेच विदयालयातील शिक्षकासह विदयार्थ्यी ही मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सुरूवातीला अतिथीच्या हास्ते राजमाता जिजाउ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.या नंतर महाविदयालयातील विदयार्थ्यी रणजित कोळगे,कु.वर्षा कोळगे,कु,संध्या कोळगे,इंद्रजित वाघमारे,या विदयार्थ्यांनी आपले मनोगत मांडले त्या नंतर अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी राजमाता जिजाउ यांचे जिवनचरित्र व कार्य यावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हारबरे जी.एम.यांनी केले तर आभार  माने आर.पी. यांनी मानले.