दरोडा टाकणारी टोळी अटक

रिपोर्टर...दरोडा टाकणारी टोळी ला आज जिल्हापोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने अटक करण्यात आली आहे दीड  किलो सोना फक्त २० लाखात देतो असे म्हणून हि टोळी अनेक लोकांना लुटायची मात्र विशेष पथकाचे प्रमुख यांनी योग्य वेळी सापाला रचून या टोळीच्या मुसक्या आवळल्या


आमच्या कडे दीड  किलो सोने आहे आणि आम्हाला तो २० लाखात विकायचे आहे असे सांगून अनेक लोकांना लुटणारी टोळीचा जिल्हापोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने फर्दाफ़ाश केलाय सुरवातीला पोलिसांनी एक डमी ग्राहक म्हणून या टोळी कडे पाठविले दुसऱ्या दिवशी हा वीस लाखाचा सौदा पक्का झाला आणि सोमवारी पैसे घेऊन या आम्ही तुम्हाला दीड  किलो सोने देतो असे या डमी ग्राहकाला  सांगण्यात आले ठरलेल्या वेळे नुसार डमी ग्राहकाला मूर्तिजापूर पिंजर रोडवर कारंजा टी पॉईंट जवळ बोलाविण्यात आले याच वेळी विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे घटना स्थळी सापळा  रचला आणि या टोळी तिल महादेव मूर्तळकर  गजानन बुटे या मुख्य आरोपीना  ताब्यात घेतले  या कारवाई नंतर याच टोळीतील मंगेश राठोड व राजू राठोड नावाचे दोन  तोतया पोलीस घटना स्थळी आले व आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून विशेष पथकाचे प्रमुख यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र हर्षराज  अळसपुरे यांनी त्यांना खाक्या दाखविताच या टोळीतील सर्व च सदस्य पोपटासारखे बोलू लागले विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी या अगोदर देखील वाशीम येथील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या दरोड्यातील या चार हि आरोपींना अटक करण्यात आली असून यांनी या अगोदर अश्या लुटमारी च्या किती घटना केल्या आहे याचा तपास  हर्षराज अळसपुरे हे करीत आहे