८ दिवसांच्या गुलाम-गिरीतून १७ शेतकऱ्यांची सुटका नापिकीमुळे शेतकरी अडकले होते दलालांच्या चावडीत

: अकोला
: नापिकीमुळे रोजगाराच्या शोधात शेतकरी वर्ग स्थलांतरासाठी मार्गावर आहे, याच संधीचा फायदा घेत काही लोक शेतकऱ्यांना रोजगाराच्या आमिष दाखवून गुलामगिरीच्या जाळ्यात अडकवत आहेत, असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील करुम व पापड गावातील १७ शेतकऱ्यांसोबत घडला आहे.
:  मूर्तिजापूर तालुक्यातील करुम व पापड भागात नापिकीमुळे शेतकऱ्यांवर  उपास मारीची वेळ आली आहे. रोजगारासाठी स्थलांतरालाही तयार असलेल्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये मजुरीचे आमिष दाखवून यवतमाळ येथील मधुकर चव्हाण याने  करुम व पापड या गावातील तब्ब्ल १७ शेतकऱ्यांना तेलंगणा येथे घेऊन गेला. तेलंगणातील संघरेड्डी जिल्ह्यातील मामाढगी या गावात नेले, या ठिकाणी येला रेड्डी नामक व्यक्तीच्या शेतात त्यांच्याकडून मजुरी करून घेतली. शिवाय रात्री गुलामाप्रमाणे एका खोलीत डांबून त्यांना मारहाण केली जात होते. जेवणही दिवसांतून एकच वेळ दिल्या जात होते. १८ डिसेंबर पासून गुलामगिरीत असलेल्या यातील एका शेतकऱ्यांने संधी साधून नातेवाइकला फोन करून आपली आपबीती सांगितली, हा प्रकार ऐकल्यावर नातेवाईक व गावकर्यांनी तत्काळ माना पोलीस स्टेशन गाठले. व घडलेला प्रकार सांगितला.  यानंतर पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने बंदिस्त शेतकऱ्यांचा ठाव ठिकाणा लावला व आपले पथक तेलंगणातील अदनूर येथे रवाना केले. त्यांनी अदनूर पोलिसांच्या साहाय्याने १७ शेतकऱ्यांची सुटका केली,