
कोल्हापूरमध्ये दसरा चौकात नारायण राणे यांची सभा पार पडली. 35 जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आपल्याला आवडतं. माझ्या स्वभावाशी मिळतंजुळतं असल्यानंच कोल्हापूरची निवड केल्याचं राणेंनी सांगितलं.
आमदारकी सोडली, राजीनामा दिल्यावर राणे संपले, हे लिहिणारे राणेंना किती ओळखतात माहीत नाही असं राणे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला.
मुंबई भकास व्हायला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. मुंबई पालिकेत पैसे घेतल्याशिवाय टेंडर काढले जात नाही असा घणाघाती आरोप राणेंनी केला.
तसंच मी कधीही मातोश्रीवरील माहिती बाहेर काढली नाही. पण मातोश्रीवर बाळासाहेबांनकुणी छळलं हे जाहीर करेल असा इशाराही राणेंनी दिला.