
जागतिक सिंधी परिषदेच्या
(वर्ल्ड सिंधी कौन्सिल) वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या
सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्या प्रसंगी मा.राज्यपाल बोलत
होते.
सिंधी समाज आज जगभर
विखुरला आहे. त्यामुळे सिंधी भाषा आणि सिंधीयतचे जतन करणे आव्हानात्मक झाले आहे.
अशावेळी सिंधी समाजाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून जगभरातील सिंधी
व्यक्तींना आणि विशेषतः युवकांना जोडून भाषा संवर्धंनासाठी विशेष प्रयत्न केले
पाहिजे, अशी मा.राज्यपालांनी
सूचना केली. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमधे सिंधी भाषा आणि
साहित्याच्या प्रसारासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्यपालांनी
यावेळी दिले.
सिंधी फेडरेशन ऑफ साऊथ
इंडियाचे अध्यक्ष मुरलीधर रामाणी, मुकुल-माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया, उद्योजक नरेंद्र विरवाणी, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
महेश तेजवानी, प्रसिद्ध
डॉक्टर गोवर्धन खनचंदाणी, मोहन बाबाणी व बी. बी. गोगिया यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर चंदर मंघनानी यांना समाज सेवेसाठी विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
जागतिक सिंधी परिषदेचे
अध्यक्ष डॉ. राम जव्हाराणी यांनी प्रास्ताविक केले तर संजय सिप्पी यांनी आभार
प्रदर्शन केले. यावेळी लेखक के के रामाणी यांनी आपले पुस्तक राज्यपालांना भेट
दिले.