गाव स्वच्छ करण्यासाठी शाळेतच स्थापण केले न्यायालय..काजाळा प्रशालेचा उपक्रम.
रिपोर्टर.. जिल्हा परिषद शाळेमध्ये न्यायालय स्थापण करूण गाव स्वच्छ करण्याचा चांगला उपक्रम उस्मानाबाद तालुक्यातील जिल्हापरिषद प्रशाला काजाळा या शाळेने हाती घेतल्याने स्वच्छ भारत मिशन या उपक्रमाला चांगलेच बळ मिळत आहे.यामुळे गाव स्वच्छ रहाण्यास मदत होत आहे.तसेच शाळेतील विदयार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागत आहेत.

केद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या उपक्रमाला चालना मिळावी म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील काजाळा या गावातील जिल्हापरिषद शाळेने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखली विदयार्थ्याच्या माध्यमातुन विदयार्थ्यी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये एक न्यायाधीश,सरकारी वकील आणि पोलीस आशा प्रकारच्या पदाची नेमनुक करण्यात आली आहे. या माध्यमातुन या ठीकानी  जो आरोपी पकडला जाईल त्याच्यावर या न्यायालयात खटला चालतो. यामध्ये स्वच्छ न रहाने,उघडयावर सौच्छास बसने,कचरा रोडवर व नाल्यात टाकने आशा प्रकारच्या गुन्हेगारांना शिक्षा होते. या मुळे गावातील लहान मुलांना स्वच्छ रहाण्याचा संदेश मिळतो आशी माहीती महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना काजाळा जि,प,प्रशालेतील विदयार्थ्यानी सांगीतली. या कामासाठी आम्हाला कांबळे बी,आर , बी,बी,पाटील, व्ही,एम,पाटील, उंबरे व्ही, बी, वाघमारे एम, बी, गाडेकर,एस,पी, माळी,ए, के, ढोबळ ए ,एम, आदि शिक्षक व शिक्षीकांचे मार्गदर्शन लाभले आसेही या विदया​र्थ्यानी सांगीतले.