स्वामी समर्थ मतिमंद शाळा नव्हे शिक्षकांचे जगण्याचे साधन...
     रिपोर्टर...           उस्मानाबादच्या मार्केट यार्डमध्ये शासनाचे अनुदान उचलण्यासाठी आणि शिक्षकांना पगारी मिळाव्यात म्हणून 15 ते 20 मुल गोळा करून स्वामी समर्थ नावाने एक मतिमंद शाळा चालवली जात आहे.शासनाचे संगळे नेम धाब्यावर बसवुन फक्त शिक्षकांच्या पगारी आणि अनुदान मिळावे यासाठी गरीब आणि दिव्यांग मुलाचे हाल केले जातात. तरी पण समाजकल्यान विभागाचे याकडे अक्षम्य दुलक्ष आसल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्यान विभागाच्या माध्यमातुन चालवली जाणारी ही मतिमंद शाळा या शाळेमध्ये विदयार्थ्याची संख्या नियमापेक्षा कमी आसताना आणि सोई सुविधांचा अभाव आसताना सुध्दा या शाळेवर आज पर्यत कसल्याही प्रकारची कारवाई समाजकल्यान विभागाने केलेली नाही.  शासनाच्या कुठल्याच नियमाचे पालन करत नसताना देखील या शाळेला अनुदान मात्र नियमीत मिळते. हाजेरीपट कमी आसताना देखीरल शिक्षकांची संख्या मात्र भरपुर आहे. मतिमंद मुलांना काय शिकवायच हे देखील शिक्षकांना माहीत नाही. आभ्यासक्रम कोनता आहे किंवा शिकवण्याच्या पध्दती काय आहेत. हे देखील या शिक्षकांना माहीत नाही तरी देखील वर्षा नी वर्ष अनुदान उचलुन आशा प्रकारच्या संस्था शासनाला चुना लावण्याचे काम करत आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेले  कालभाहय झालेले साहीत्या,त्याचबरोबर एक्सपायरी झालेली मेडीसीन ,शाळेचा परिसरात घाणीचे साुम्राज्य, मुल्यांच्या जेवणाची सोय नाही. शाळेच्या वरती बोर्ड नाही, गैरहाजर विदयार्थयाची हाजेरी शिक्षक नियमीत बरतात. हाजर विदयार्थ्याचे मेडीकल नाहीत आशा प्रकारच्या आसंख्य चुका आसताना देखील या शाळा शासनाच्या डोळयात धुळ फेकुन चालतात. आणि विदयार्थ्याचे हाल करून महीण्याकाठी आपली पगार उचलुन शिक्षक मात्र बुलेटवर फिरतात. आशा प्रकारे शासनाची दिशाभुल करणार्या शाळेवर कारवाई होने गरजेचे आहे.