
राज्य शासनाने शेतकऱ्याच्या सोयाबीन उडीद ,मुग या पिकाच्या खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू केली. मात्र खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड अडवणूक चालू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पावणे पाच हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद खरेदीच्या नोंदी केल्या. आजतागायत केवळ 250 शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यात आलीये.
त्यातच शासनाने आता एक नवीन परिपत्रक काढलंय. त्यात शेतकऱ्याला सोयाबीन आणि उडीद घालताना मर्यादा घालून दिल्या. त्यात तुळजापुर तालुक्यासाठी उडीद 180 किलो तर मूग 166 किलो अशा मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे.. याचं मुद्द्याला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज हे आंदोलन केलं.