
यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, अवर सचिव महेश वाव्हळ, रा. मो. गोसावी आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.