शासकीय बैठकीपूर्वी केली मागण्यांबाबत चर्चा

;

https://f5mail.rediff.com/bn/downloadajax.cgi/2017-11-23-PHOTO-00000031.jpg?login=shriramkshirsagar&session_id=5L28PK1KJK6Wv7GtodvzgMVap2qEtOi0&formname=download&file_name=1511441115.S.4146989.1112.H.WU5DUCBPc21hbmFiYWQA4KSq4KWN4KSw4KWH4KS4IOCkqOCli~Cknw__.RU.rfs247,rfs247,454,531.f5-224-150&folder=Inbox&filetype=image/jpeg
     उस्मानाबाद रिपोर्टर..                 जिल्ह्यातील  शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्रास देणार्‍या सरकारमधील मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत देऊनही सरकारने दखल न घेतल्याने गुरुवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेे.

भल्या पहाटे 5 वाजता कडाक्याच्या थंडीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीवरील मुरुड गावाजवळ मोठ्यासंख्येने शेतकरी, कार्यकर्ते घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील स्वतः महसूल मंत्री  पाटील यांना रोखणसाठी सज्ज झाले होते. राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाने महसुलमंत्री पाटील यांचा दौरा कार्यक्रम दोनवेळा बदलला. सुरुवातीला मुरुड, नंतर औसा, पाडोळीमार्गे येणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात सकाळी 7 च्या सुमारास ते तुळजापूरमार्गे आले. रस्त्यावरील खड्डयांबाबत आंदोलन असल्याची माहिती प्रशासनाने महसूल मंत्र्यांना दिली होती. परंतु राष्ट्रवादीने आंदोलन यशस्वी करण्यासाठी केलेली तयारी पाहता महसूल मंत्र्यांनी पहाटेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. यावेळी आमदार पाटील यांनी आंदोलनाचे विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर महसूल मंत्र्यांनी या सर्व बाबी अतिशय संवेदनशील असून मला सर्वच विषय महत्वाचे वाटत असल्याचे सांगत उस्मानाबादला आल्यावर नियोजित बैठकीपूर्वी आपण चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांना अवगत करून तोडगा काढू असे आश्वस्त केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महसुलमंत्र्यांची जिल्हाबंदी करण्याऐवजी काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन केले.

महसुलमंत्र्यांनी अचानक मार्ग बदलला असतानादेखील  पाटोदापाटी येथे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान 300 पेक्षा अधिक शेतकरी, कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखविले. शहरात प्रवेश करताना देखील शासकीय तंत्रनिकेतन जवळ दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रचंड घोषणा देत काळे झेंडे दाखवले. तसेच वाठवडा येथे पहाटे ५. ३० वा. जिल्हा सरहद्दीवर महसूल मंत्री या मार्गे येणार नाहीत समजल्यानंतर निषेध म्हणून रास्ता रोको करून पोलिसांना निवेदन दिले. शहरात दाखल होताच मंत्री पाटील यांनी नियोजित बैठक बाजूला ठेवून आ. पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच पुढील नियोजित कार्यक्रमामुळे येथे जास्त वेळ नसल्यामुळे प्रत्येक मागणीची सविस्तर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांना सोलापूर पर्यंत सोबत घेवून गेले. आ. पाटील यांनी सर्व मागण्या सविस्तरपणे मांडल्या. या दरम्यान उडीद मूग, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या प्रश्नावर आजच संध्याकाळी  मुख्यमंत्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक घेऊन हमीभावाने खरेदी मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कर्जमाफी होईल की नाही, या विवंचनेत नैराश्यातून एकुरका येथील शेतकरी आत्महत्येची घटना आ. पाटील यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मंत्री महोदयांनी कर्जमाफीसाठी निधीची तरतूद केली असून, पैसे देणार असल्याची खात्री बाळगावी, टप्या टप्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील असे आश्वासित केले. तसेच उर्वरित विषयासंदर्भात मा.मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले.


आमदार राणाजगजितसिंह पाटील

आंदोलन हे जनतेच्या समस्या सरकारदरबारी मांडून त्यांची सॊडवणूक करण्यासाठी असतात,ती राजकीय स्टंट अथवा माध्यमांत झळकण्यासाठी नसतात,त्यामुळे आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेंव्हा मंत्री महोदयांनी स्वतःहून दूरध्वनी करत सकारत्मक प्रतिसाद देत शेतकरी व जनतेच्या हिताच्या प्रश्नांना मा.मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवत सोडवणूक करण्याची भूमिका घेतली त्यामुळे जिल्हाबंदी ऐवजी शेतकऱ्यांच्या भावना  पोहचवण्यासाठी काळे झेंडे दाखवले,, आंदोलनातं मोठ्या संख्येने शेतकरी,पक्षाचे कार्यकर्ते यांनी पहाटेची वेळ असताना सुद्धा सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे आभार..सरकारने जर यावर ठोस निर्णय नाही घेतला तर मग मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल याबाबत कुठलीच शंका असण्याचं कारण नाही-राणाजगजीतसिंह पाटील