बोरगावात अनधिकृत धार्मिक स्थळ अतिक्रमण हटविलेबोरगाव मंजू  : रिपोर्टर..
स्थानिक   पोलीस ठाणे हद्द येणार्‍या शहरातील  व ग्रामीण भागातील  दोन  गावातील  धार्मिक  स्थळे  मा . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक अतिक्रमण निष्कासीत करने  क्रमप्राप्त  असल्याने अनधिकृत बांधकामांवर  आज बुधवारी सकाळी  गजराज  चालून  हटविले  तर  महसूल व  पोलीस  प्रशासनाने  संबंधित संस्थान प्रमुख यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या 
अतिक्रमण न काढल्याने आज बुधवारी सकाळी मोहीम राबविण्यात आली. व सदर शहरातील  दोन धार्मिक स्थळे तर   राष्ट्रीय   महामार्ग    धार्मिक स्थळे शासकीय  यंत्रणा मार्फत  हटविले  
  सदरचे  धार्मिक  अतिक्रमण नोटीस मिळाली  पासून  तीन दिवसाच्या आत निष्कासीत  करावे अशी  नोटीस बजावण्यात आली होती, दरम्यान  न हटविलयास सदरचे  धार्मिक  अतिक्रमण  शासकीय  यंत्रणा  मार्फत निष्कासीत  करण्यात येईल   अशी  नोटीस  महसूल व पोलीस प्रशासनाने संबंधित संस्थान प्रमुख यांना  बजावली होती तर  आज  शहरातील  दोन धार्मिक स्थळे  व महामार्गावरील  तीन  ठिकाणी  गजराज  चालून धार्मिक स्थळे हटविले    ही  मोहीम  महसूल विभाग  नायब तहसीलदार आत्राम,  मंडळ अधिकारी सुनील देशमुख, डि. के  इगळे, निळकंठ नेमाडे, भूमापन  चे  एन . एम . मेश्राम,  ग्रामसचिव विलास  देउळकर,  तर कायदा व सुव्यवस्था साठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात ठेवून ठाणेदार पि. के. काटकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता