' जलयुक्त' मधील उत्कृष्ट कार्याबद्दल सारोळा गावास परितोषकउस्मानाबाद: शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदवून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार मिळाला आहे़
शुक्रवारी (दि़१७) लातूर येथील दगडूजीराव देशमुख सभागृहात जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या हस्ते जि़ प़ उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील व सरपंच प्रशांत रणदिवे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पुरस्कार व ५० हजार रूपयांचे पारितोषक स्विकारले़ यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ़ सुजितसिंह ठाकूर, विभागीय आयुक्त भापकर, प्रभारी गटविकास अधिकारी तायडे, माजी जि़प़ सदस्य श्यामसुंदर सारोळकर, कृषी सेवक आनंद आवारे, कृषी मंडळ अधिकारी नाईकनवरे, ग्रामसेवक प्रशांत नाईकवाडी आदींची प्रमुख उपस्थिती होती़