भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
सुधीर (आण्णा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल
स्पर्धेचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलाच्या मैदानावर
शनिवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. या स्पर्धेस
राज्यातील ४३ संघ सहभागी झाले आहेत. भागीरथी परिवाराच्यावतीने या
राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपा नेते सुधीर (आण्णा) पाटील,
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीन
भोसले, विजयकुमार शिंगाडे, सरचिटणीस प्रभाकर मुळे, येडशीचे विजयकुमार
सस्ते, काटीचे उपसरपंच सुजित हंगरकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे
उपप्रशासकीय अधिकारी तथा स्पर्धेचे संयोजक आदीत्य पाटील, प्राचार्य एस.एस.
पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाचा सामना येडशी व काटी
या संघामध्ये पार पडला. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला.
येडशी संघाने नाणेफेक जिंकली यानंतर झालेल्या रंगतदार सामन्यामध्ये दोन्ही
संघाने उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाचे सादरीकरण केले. अत्यंत चुरशीच्या
झालेल्या या सामन्यात येडशीच्या संघाने विजयश्री संपादन केली. त्यानंतर
रात्री उशिरापर्यंत सामने सुरू होते. या स्पर्धेचे समालोचन आर.बी. जाधव,
श्री. पाटील यांनी केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आर.जी. बोबडे, घोणसे
रावजी, श्री. शिंदे, ऍड. भोसले, श्री. वाघ हे काम पाहत आहेत. स्पर्धेत
सहभागी संघातील खेळाडूंच्या भोजनाची व शुध्द पाण्याची सोय भागीरथी
परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुकाराम
शेटे, सुनिल पवार, प्रसाद देशमुख, श्री. कापसे, ऍड. मडके, आबा गायकवाड,
पंडीत मंजुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. संतोष
घार्गे, एस.एस. देशमुख, न.रा. नन्नवरे, पिंटू सदावर्ते, नाना घोगरे,
सुर्यकांत कापसे, राम मुंडे, भागीरथी परिवार व आदर्श शिक्षण प्रसारक
मंडळाचे सर्व शिक्षक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत