रिपोर्टर.. उस्मानाबाद व बिड जिल्ह्यातील धरणग्रस्त व इतर शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात
पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १० एम.एम.क्यूब पाण्याचे आरक्षण याकामी करण्यात
यावे. मांजरा धरणातून लातूर एमआयडीसीला मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येते,
एवढ्या दुरून पाणी आणण्याऐवजी लातूर शहरानजीकच्या पाणी साठ्यातून औद्योगिक
वापराचे आरक्षण करण्यात यावे. यामुळे उपलब्ध झालेले अतिरिक्त पाणी
उस्मानाबाद व बिड जिल्ह्यातील धरणग्रस्त व इतर शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात
पाणी वापरासाठी आरक्षित करण्यात यावे. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी मांजरा धरणातून शेतीला देण्यात येणारे पाणी हेच तेरणा धरणातील बंद पाईप प्रणाली प्रमाणे देण्याबाबत अहवाल बनविण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात याव्यात. यासाठी
कळंब - उस्मानाबादचे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी राज्याचे मंत्री
तथा अध्यक्ष कालवा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य ना.श्री.संभाजी पाटील
निलंगेकर यांना पत्र देवून मागणी केली आहे. जिल्हा परिषद, उपाध्यक्षा
सौ.अर्चनाताई पाटील, पं.स.सभापती दत्तात्रय साळुंके, उपसभापती भगवान ओव्हाळ
यांनी दि.१७/११/२०१७ रोजी लातूर येथील आढावा बैठकीत मागणीचे पत्र मंत्री
महोदयांना दिले.