अकोला--अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या म्हैसांग येथे दोन गटात 12 वाजताच्या दरम्यान तुफान हाणामारी होऊन ठाणेदार काटकर यांचेसह 15 व्यक्ती जखमी झाले असून जमावाला पांगविण्या साठी पोलीसना लाठी चार्ज करावा लागल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण वरून दोन गट समोरासमोर आल्याने बोला चालीचे रूपांतर तुफान हाना मारीत झाले असून पोलिसांनी सुरुवातीला सामंजस्याची भूमिका घेत दोन्ही गटांना समजावून एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव पंगत नसल्याचे दिसताच पोलिसांना लाठीमार करावा लागला असून लाठी मर व हाणामारीत बोरगाव मंजुचे ठाणेदार काटकर व जमावतील 15 व्यक्ती जखमी झाले असून त्याना उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार मध्ये इलाजासाठी दाखल करण्यात आले असून अकोला येथून राखीव पोलीस दल व आर सी पी चे जवान घटनास्थळी रवाना झाले असून वरिष्ट अधिकारी परिस्थिती वर नियंत्रण ठेवून आहेतआहेत.